अमेरिकेतल्या कोलोराडोमध्ये जीवघेणा हल्ला, आगीत सहा जण होरपळले   

कोलोराडो : अमेरिकेतल्या कोलोराडो या ठिकाणी यहुदी समुदायाच्या एका कार्यक्रमा दरम्यान मोठा हल्ला करण्यात आला. स्थानिकांचे म्हणणे आहे की, संशयिताने आंदोलकांना पेटवण्याचा प्रयत्न केला. FBI चे संचालक काश पटेल यांनी हा दहशतवादी हल्ला असल्याचे म्हटले आहे. या हल्ल्यामागे नेमका काय उद्देश होता हे अजून स्पष्ट होयचे आहे, असे पोलिसांनी म्हटले.  

FBI संचालक काश पटेल नेमके काय म्हणाले

FBI चे संचालक काश पटेल म्हणाले की, हा एक दहशतवादी हल्ला होता. चीफ रेडफियरनने म्हटले आहे की, पोलीस अद्याप या हल्ल्याला दहशतवादी हल्ला म्हणत नाहीयेत. रविवारच्या डाऊनटाऊन मध्ये पर्ल स्ट्रीट या ठिकाणी एक निवांत दुपार होती, त्यावेळी अचानक हा हल्ला झाला. या हल्ल्याचा निषेध करावा तेवढा थोडा आहे. मी तुम्हाला हे आवाहन करतो की, जे पीडित आहेत त्यांचा आणि त्यांच्या कुटुंबाचा विचार करा. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुमारे सहा ते सात लोक आगीमध्ये होरपळले आहेत. या सगळ्यांना रुग्णालयात दाखल केले आहे. पोलिसांनी या ठिकाणी पायी चालण्यास मज्जाव केला. हल्ल्यानंतर या ठिकाणी काळ तणावपूर्ण वातावरण होते. या ठिकाणी श्वान पथक आणून तपास सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
 

Related Articles